लोहारा येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा

ग्रामीण प्रतिनिधी
संतोष मोरे
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्वशांती बौध्द विहार येथे दि. ६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरवात ञिशल, पंचशील, बुद्ध वंदना घेऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना प्रत्येक भारतीयांसाठी मिळालेली अमुल्य देणगी आहे माणसाला माणूस म्हणून मिळालेली गॅरंटी आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे अग्रदुत आहेत त्यांचे विचार शाश्र्वत असुन अखिल मानव जातीचे कल्याण करणारे आहेत. दर वर्षी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने मुंबई येथे चैत्य भुमी येथे जात होते परंतु या वर्षी कोरोना माहामारी मुळे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आपआपल्या घरीच राहुन मानवंदना करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले .या कार्यक्रमाला लोहारा येथील यशोधरा महिला मंडळ ,मोरे मिञ मंडळ व बौद्ध बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.