ताज्या घडामोडी
बाळापूर येथे बौद्ध बांधव समितीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

निलेश किरतकार
मुख्य संपादक
बाळापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या वर्षी कोरोना संक्रमण असल्याने बाबासाहेबांच्या अनुयायांनी शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करून बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात सुद्धा बौद्ध बांधव उत्सव समिती , बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बौद्ध बांधव उत्सव समितीचे समस्त पदाधिकारी तसेच शहरातील बौद्ध बांधव , बालक बालिका उपस्थित होते. यावेळी बुद्धपूजा तसेच सरणतय्य घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.