ताज्या घडामोडी

तामकराड येथे तुळशीविवाह पंचक्रोशीतील भाविकांची कार्यक्रमाला उपस्थित ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी

मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथुन जवळच असलेल्या तामकराडा येथील ऋषी महाराज संस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असुन दर सोमवारी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पोर्णिमेच्या दिवसी तुळशीविवाह कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा बुलढाणा वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज प्रिपरीकर ता. मेहकर याच्या मधुर वाणीतुन हरीकिर्तनाचा कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी भक्तांनी लाभ घेतला तसेच भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या संस्थान विषयी सागायचे झाल्यास
मुंगळा परिसरातील देव माणुस म्हणजे हभप बबन महाराज मोहळे हे होत…


आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराजांनी द-याखो-यातील निबिड जंगलातील ऋषी महाराजांचे ठिकाण तामकराड हे नावारूपाला आणले आहे.
पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात किर्तनाचे कार्यक्रम घेणं जिकिरीचं होते त्या उलट तान्हिल्या जिवन वनामाजी या जगद्गुरू तुकाराम महाराज यांची उक्ती सार्थ ठरवत हभप बबन महाराज मोहळे हे तामकराड सारख्या दुर्गम डोंगरमध्ये. महाशिवरात्र…नागपंचमी तसेच तुळशीविवाहाचे. कार्यक्रम सातत्याने व तितक्याच उत्साहाने साजरे करत आहेत…
आध्यात्मिक शक्तीला सदाचाराची जोड बसली असता त्यातुन नितांतसुंदर प्रबोधन व सामाजिक कार्य आपसूकच घडते याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे तामकराड संस्थान व बबन महाराज मोहळे आहेत
या वेळी मौजे डोंगरकिन्ही. रेगाव. मुंगळा. अंधारसावंगी. येथील भजनी मंडळ उपस्थित होते….

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: