पातुर तालुका विकास मंचच्या वतीने साजरा केला नाविण्यपूर्ण वाढदिवस…

सर्व प्रकारच्या क्षेत्रातील गुणवंत,कलावंतांचा यथोचित सन्मान
अविनाश पोहरे – संपादक
पातुर शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून कुठलाही भेद न करता त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे चाणाक्ष पत्रकार किरणकुमार निमकंडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने नाविण्यपूर्ण पद्धतीने गहिलोत लाॅन येथे पातुर तालुका विकास मंचच्या वतीने साजरा करण्यात आला.रिकाम्या दुधाची पिशवी द्या व मोफत वृक्षाचं रोप घेऊन जा सोबत एका रिकाम्या पिशवीचे चाळीस पैसे प्रमाणे ते पैसे घेऊन जा असा उपक्रम राबविण्यात आला.अनेक नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद देत शेकडो झाडांची रोपं रिकाम्या दुधाच्या पिशव्या देऊन घेऊन गेले व शहराला तसेच तालुक्याला प्लास्टीक मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला.
निसर्गाचं पर्यावरण पुरक वातावरण निर्माण व्हावं त्यासाठी अनेक वृक्ष लावली जावी यासाठी हा छोटा प्रयत्न होता.
आज शहराच्या विकासासाठी होणारी वृक्षतोड म्हणजे पर्यावरणाचा -हास आहे. सामान्य नागरिकांना भविष्यात श्वास घेण्यासाठी पैसे मोजावे लागू नये याकरिता अधिकाधिक वृक्ष लागवड झाली पाहिजे कारण सर्वात जास्त ऑक्सिजन हे झाडांपासून तयार होते.बाळापूर विधानसभा क्षेत्रातील लहान मुला मुलींना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा त्यावेळची स्थापत्यकला समजावी वेगवेगळ्या किल्ल्यांची नावे त्यांची माहिती अवगत व्हावी या शुद्ध हेतूनेच पातुर तालुका विकास मंचच्या वतीने भव्य किल्ले प्रदर्शन स्पर्धा २०२० हा उपक्रम घेण्यात आला.यामध्ये पातुर आणी बाळापूर या तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हाता येथील चि.प्रतिक कुचके याने प्रथम क्रमांक , सस्ती कु.सायली राऊत द्वितीय क्रमांक , खानापूर कु.वैष्णवी वालोकार तृतीय क्रमांक , शिर्ला चि.विशाल गवई चतुर्थ क्रमांक व पातुर येथील चि.समर्थ बोंबटकार यानी पाचवा क्रमांक मिळविला आहे.विजेत्या स्पर्धकांना उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम , प्रमाणपत्र , पुष्पगुच्छ व एक झाडाचे रोप देवून गौरविण्यात आले.इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व ठरलेली रोख रक्कम देण्यात आली यामध्ये एकुण १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी आपली परिस्थिती हालाकीची असुनही बुद्धीमत्तेच्या कौशल्याने चि.प्रतिक ढाले यानी विमुक्त जाती मधून महाराष्ट्र राज्यात नीट मध्ये दुसरा क्रमांक पटकावून एमबीबीएस साठी केईएममध्ये प्रवेश मिळविला तर कु.पल्लवी गोतरकार हिने स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस करीता प्रवेश मिळविला सोबतच पेन्सिल आर्ट स्केच चं कुठलंही शिक्षण न घेतलेल्या व नुकताच बी ई इंजिनिअर झालेल्या चि.अंकीत इंगळे यानी अनेक सुंदर चित्रांचे पेन्सिल आर्ट कलेतून चित्र साकारले आहे.अर्जुनसिंह गहिलोत हा उच्च शिक्षित असुन तो एक उत्कृष्ठ असा गायक आहे अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रातील गुणवंत,कलावंतांचा यथोचित सन्मान याप्रसंगी पातुर तालुका विकास मंचच्या माध्यमातून किरणकुमार निमकंडे यांच्या वाढदिवशी करण्यात आला. याप्रसंगी पातुर तालुका विकास मंचचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस , ठाकुर विजयसिंह गहिलोत , पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे , निलेश गाडगे , नारायणराव अंधारे , वीरपिता काशीराम निमकंडे , महादेव निमकंडे , विलासराव राऊत सर , गटनेता अजय ढोणे , अभिजीत गहिलोत , बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे , सौ.सपनाताई राऊत , सौ.वैशाली निकम , राजेश आवटे , गजानन बारताशे , महादेव खंडारे , मंगेश गाडगे , कैलास बगाडे , बालु बगाडे , सचिन बारोकार , सचिन ढोणे , सचिन बायस , गणेश गाडगे , योगेश फुलारी , सागर कढोणे , आकाश हिवराळे , अमोल करवटे , निशांत बायस , अजिंक्य निमकंडे , परशराम उंबरकार , अंबादास देवकर , अनिल निमकंडे , प्रशांत लोथे , सुनिल पाटील , विनोद तेजवाल , सागर रामेकर , जेष्ठ पत्रकार राजाराम देवकर , रामेश्वर वाडी , अविनाश पोहरे , स्वप्निल सुरवाडे , पांडुरंग गोतरकार , सैय्यद मुशर्रफ , जाबीन शेख आणी बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते.