ऊंबर्डाबाजार येथे कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचे पालन विद्यार्थ्यांना मास व ऑक्सीजन पातळी तपासुन शाळे मध्ये प्रवेश प्रवेश

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
उंबर्डाबाजार जिल्हा परिषद विद्यालयात कोवीड प्रतिबंधक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करून वर्ग १० व १२ वी चे प्रत्यक्ष अध्यापन वर्गाला सुरूवात करण्यात आली . दि. २३ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन व विकास समिती तसेच सर्व कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये झालेल्या सभेतील चर्चेनुसार माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यास संमती देण्यात येवुन त्यानुसार प्रत्यक्ष वर्ग अध्यापन सुरू करण्यात आले त्यामध्ये दहावीचे ८३ पैकी १९ आणि बारावीचे ९६ पैकी २४ विद्यार्थी इतके विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयात दररोज प्रभारी प्राचार्य मिलिंद खडसे यांचे मार्गदर्शनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्या ची थर्मल टेस्टिंग, ऑक्सीजन पातळी ,चे मापन करूनच प्रवेश देण्यात येत असुन तोंडाला मास ,निर्जंतुकीकरण , विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर घेऊन बैठक व्यवस्था तसेच इतर सर्व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात आले आहे . या दरम्यान उंबर्डाबाजार सर्कलच्या केंद्रप्रमुख सौ.खाडे मॅडम यांनी जिल्हा परिषद विद्यालया ला प्रत्यक्ष भेट दिली आणि पाहणी करून विद्यालयातील आसन व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.