ताज्या घडामोडी

अकोट – अकोला रस्त्यासाठी छावा संघटनेच्या वतीने होम हवन…!!

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधी

अकोट-अकोला राष्ट्रीय महामार्ग गेल्या ३ वर्षापासुन अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाचा व सुस्थ ठेकेदार व मस्तवाल अधिकारी यांच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने तांदुळवाडी फाटा येथे जिल्हाप्रमुख डॉ.शंकरराव वाकोडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संपर्कप्रमुख निवॄत्ती पाटिल वानखडे यांच्या नेतृत्वात होम हवन चे आयोजन करण्यात आले होते. रस्ता कुठ झाला आहे तर कुठं काहीच नाही रस्ता खोदुन ठेवल्यामुळे वाहनचालकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.धुळीच साम्राज्य रस्त्यावर दगडांचा खच यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे‌‌.मणक्याचे त्रास वाढत आहेत.तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व संबंधित ठेकेदाराने त्वरित लक्ष घालुन अकोट – अकोला रस्त्याचे काम सुरू करावे ही सद्बुद्धी त्यांना येवो याकरिता छावा संघटनेच्या वतीने होम हवन करणात आले
यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.शंकरराव वाकोडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संपर्कप्रमुख निवॄत्ती पाटिल वानखडे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक प्रविण बानेरकर,जिल्हा सचिव परिक्षित बोचे, तालुकाप्रमुख अॅड.सुशिल खवले,तेल्हारा तालुकाप्रमुख उमेश कुकडे, उपतालुकाप्रमुख गणेश इंगळे,अकोट तालुका सल्लागार गोकुळ पानझाडे, उपतालुकाप्रमुख अरविंद बानेरकर,ज्ञानेश्वर पाटिल मानकर,धनराज गावंडे,निखिल रोडे,आशिष नागापुरे,विवेक इंगळे,दिलीप भगत,सुधाकर गडम,बजरंग बघे,अभिजित कडु,ओम चवरे, गजानन कडु,ज्ञानेश्वर रोडे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच अकोट ग्रामीण पोलीसांचे विशेष सहकार्य लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: