राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई कावरे यांचा बाळापूर दौरा संपन्न

नितिन हुसे
तालुका प्रतिनिधी बााळापूूर
बाळापूर दि.३०….
आ. खा. शरदचंद्रजी पवार साहेबांना अभिप्रेत असणारे पक्ष संघटन बांधणी करण्यासाठी ओबीसी प्रदेशाध्यक्ष मा.ईश्वरजी बाळबुधे, अकोला जिल्हाध्यक्ष मा.संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रीय कार्यकारीणी सचिव मा. डॉ. आशाताई मिरगे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुषमाताई कावरे यांचा बाळापूर तालुका दौरा आज दि. ३० नोव्हेंबर रोजी पार पडला. या दौऱ्यात तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन तालुक्यात महिला ओबीसी कार्यकर्यांची उत्तम फळी तयार करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव सौ. विद्याताई अंभोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा अकिला दिदी, बाळापूर शहर अध्यक्ष श्री.दिपकभाऊ धनोकार,बाळापूर तालुका महिला अध्यक्षा सौ.सुनिताताई ताथोड, बाळापूर शहर युवक अध्यक्ष जावेदभाई,जयकीरण कावरे,श्वेताताई तुरके, पुजाताई धनोकार, अस्मिताताई वानखडे पत्रकार नितिन हुसे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.