बोरखेडी सिंचन लघुपाटबंधारे विभागाकडून प्रकल्प उभारला पण शेतकऱ्यांना ये – जा करीता रस्ता नसल्याने कसरत

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
बोरखेडी सिंचन प्रकल्पामुळे कोलखेड हे गांव पूर्णतः बुडीत क्षेत्रात गेले असून गावातील जवळपास ३०० च्या वर कुटुंब यामुळे बाधित झाली आहेत. हा प्रकल्प उभा होऊन आज आज जवळपास १३-१४ वर्ष उलटूनही शेतात जाणाऱ्या रस्त्यांची,पुलांची आणि शेतात जाणारे सर्व रस्ते बुडीत क्षेत्रात गेले आहेत.त्यामुळे शेतात जाण्यास अडचण निर्माण होत आहे.व पाण्यातून शेतात जावे लागत आहे. गावात शासनाकडून मिळालेल्या जागेवर धरणग्रस्तांनी पक्के घरे बांधली.पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व जलकुंभ बांधण्यात आला पण तो हि अत्यंत निकृष्ट. दर्जाचे
आहे. एकूणच या सर्व समस्यांमुळे कोलखेडवासी पूर्ण त्रस्त आहेत. रस्ते व पूल पहिल्याच पाण्यात वाहून गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यास कुठलेही मार्ग नाहीत.कोलखेड वरून मोप २ कि. मी. अंतर असून विद्यार्थ्यांना कमरेवर पाण्यातून मार्ग काढून शाळेत जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आणि शैक्षणिक नुकसान होत आहे . या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर कोलखेड वासियांना योग्य त्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे