ताज्या घडामोडी
महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दीन म्हणून साजरा व्हावा संभाजी ब्रिगेड ची मागणी : गोपाल देशमुख

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
संभाजी ब्रिगेड च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष गोपाल देशमुख यांनी सांगितले की महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दीन म्हणून साजरा व्हावा .
या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष गोपाल देशमुख, जिल्हा संघटक गजानन देशमुख, शाखाध्यक्ष सतीश वाघ, ग्राम पंचायत सदस्य भास्कर कांबळे, सुनील चव्हाण, अमोल मोरे, जनार्दन कांबळे, आकाश कांबळे, शुभम मैदांकर, सिद्धार्थ कांबळे, पिंटू कांबळे , अक्षय कंकणे यांची उपस्थिती होती.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.