वाडेगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

नितिन हुसे
तालुका प्रतिनिधी बााळापूूर
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केले यावेळी पुण्यतिथीनिमित्त नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे आयोजन माळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन धनोकार यांनी केले होते यावेळी कार्यक्रमाला डॉ हिंम्मतराव घाटोळ, एडवोकेट सुबोध डोंगरे, युवक काँग्रेसचे महासचिव अभिलाष तायडे,सुगत डोंगरे, बळीराम घाटोळ, अशोक पोटदुखे,अरूण हुसे शिवलाल घाटोळ,सुश्रूत भुस्कूटे,अनिरूध्द घाटोळ उपस्थित होते.