ताज्या घडामोडी
महात्मा फुले वाचनालय बाळापूर येथे महात्मा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापूर – बाळापुर शहरातील कासारखेड विभागातील महात्मा फुले वाचनालय येथे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.दरवर्षी हीच पुण्यतिथी मोठ्याथाटामाटात तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून फार मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. परंतु यावर्षी कोरोणा रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ धनोकार, उपाध्यक्ष किरण हुसे, सचिव नितीन हुसे, ग्रंथपाल अभिमन्यू धनोकार,धनराज लहाने, व इतर बच्चेकंपनी उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.