रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद कडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ह्यांना स्मृतिदिनी अभिवादन

अविनाश पोहरे – संपादक
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ह्यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद कडून महामानव ह्याच्या कार्याला पातूर येथील संभाजी चौक येथे स्थित असलेल्या महात्मा फुले स्मारक येथे पुष्पहार व मेणबत्ती प्रज्वलित करून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ह्याच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हासंघटक आकाश हिवराळे,सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस ठाकुर, प्रहार सेवक अमोल करवते,अकोला एक्सप्रेस न्यूज चे संपादक अविनाश पोहरे,पत्रकार किरणकुमार निमकंडे,योगेश फुलारी,योगेश गवई,विद्यार्थी कार्यकर्ते सुरेंद्र अवचार,शुभम खंडारे,विकास सदार, सम्राट तायडे,किरण कावळे,तुषार सिरसाट,विश्वजीत हिवराळे आदींसह असंख्य सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.