निंबा फाटा चौकात अवैध दारू विक्री सुरू !
अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी नया अंदूरा
बाळापूर तालूक्यातील ग्राम निंबा फाटा येथील चौकातील निंबा रोडवर खूलेअाम भर दिवसा अवैध दारू विक्री सुरू असुन याकडे समंधित पोलीस स्टेशन दुर्लक्ष करीत आहे असे दिसून येते आहे निंबा फाटा येथे गेल्या मार्च महिन्यापासून पोलीस चौकी दिलेली आहे परंतु पोलीस चौकीच्या मागे काळाबाजार सुरू आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे .संपूर्ण देशात गेल्या मार्च महिन्याच्या २२ तारखेपासून लाॅकडाऊन चालू झाले होते तेव्हा पासून सुध्दा निंबा फाटा येथील पोलीस चौकीच्या मागे चालू असलेली अवैध दारू विक्री बंद नव्हती तर आता कशा प्रकारे बंद होणार आहे असा सुध्दा प्रश्न उपस्थित झाला आहे याकडे कोणते अधिक लक्ष केंद्रित करतीन की नाही असे स्पष्ट निंबा फाटा परिसरातील लोकांना वाटत आहे.निंबा फाटा येथे अवैध दारू विक्री करणारे लोक समंधित पोलीस स्टेशन मध्ये पैसे देऊन तेथील पोलीस लोकांना व बिट जमादार लोकांना शांततेत ठेवतात म्हणून समंधित पोलीस कारवाई करण्यासाठी अपयशी ठरत आहे असे तर नाही ना कारण निंबा फाटा येथे दररोज हजारो रुपयांची दारू विक्री करण्यात येत आहे तर दुसरीकडे निंबा फाटा येथे चौकात असलेल्या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी ते अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष करतात आणि वाहन धारकांना आर्थिक त्रास देतात त्यांच्या कडून २०० रूपये दंड वसूल करतात व अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकान दाराकडे दुर्लक्ष करात व जे पोलीस निंबा फाटा येथील पोलीस चौकीत पाठविले असतात ते तर पोलीस चौकी वाऱ्यावर सोडून लोहारा शेगांव अकोट रोडवर चौकीपासून कोसो मिटर दुर रोडवरउभे राहून पैसे वसुल करून कारभार चालवतात त्यांच्यावर आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे .निंबा फाटा चौकातील निंबा रोडवरील अवैध दारू विक्री करणाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करून निंबा फाटा येथे कायमस्वरूपी अवैध दारू विक्री बंद करावी त्याने निंबा फाटा परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येऊन हजारो लोकांचे कुटुंब उधवस्त होत आहे व समंधित पोलीस स्टेशन पैशांच्या अभावी कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही तर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने तसेच अमरावतीच्या दारू बंदी विभागाणे गुप्त सापळा रचून निंबा फाटा गाठून येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानावर तसेच विक्री करणाऱ्या वर पुढील कारवाई करावी अशी मागणी निंबा फाटा परिसरातील अनेक नागरिक करीत आहेत












