ताज्या घडामोडी

संदीप नागराले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

अनंतकुमार गवई – मुंबई

दहा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला संदीप नगराळे मूळचा नागपूरचे राहणारे. ते एक उद्योजक तसेच चित्रपटाच्या निर्मितीतही सहभागी आहे. सकारात्मक विचारसरणी असणार्‍या संदीपने मुंबईत अनेक कार्यक्रम केले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती अभियानावर एक लघुपट तयार केला. कॉमेडियन सुनील पाल अभिनीत ‘एक होता लेखक’ या मराठी चित्रपटाव्यतिरिक्त, संदीप ने ‘आखरी गब्बर’ या हिंदी चित्रपटात सह-निर्मात्यांशी सहभाग होता. सध्या त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचीही योजना आखली आहे. बॉलिवूडमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सर्वात प्रतिष्ठित लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले. कृष्णा चौहान फाउंडेशन अंतर्गत अंधेरी मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार शोचे आयोजक कृष्णा चौहान आहेत ज्यांनी बॉलिवूड आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार कार्यक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संदीप नगराळे यांच्या व्यतिरिक्त चुनरिया फेम गीतकार सुधाकर शर्मा, संगीतकार दिलीप सेन, गायक शाहिद माल्या, अभिनेता सुनील पाल, अजाज खान, ब्राइट आउटडोअरचे संचालक डॉ. योगेश लखानी, अरविंद वाघेला, दीपा नारायण झा, अँकर चारुल मलिक, के.के. गोस्वामी, डिजिटल मार्केटिंग कंपनी इंकिंग आयडियाजचे संचालक वसीम अमरोही, फिल्मी मंत्राचे संचालक मुर्तुजा इब्राहिम रंगवाला, कार्यकारी निर्माता सोहेल अब्बास, करणी सेनेचे मुंबई अध्यक्ष डॉ. रिचा सिंह, लेखक तृष्णा प्रकाश सामत, सामाजिक कार्यकर्ते अनिता तावडे, सामाजिक कार्यकर्ते मयंक शेखर, अविनाश गोयल, शब्बीर शेख, डॉ. रहमान शेख, गायक राधे राधे आणि बॉलीवुड चे पत्रकार संतोष साहू, सोहेल फिदाई, अमित मिश्रा, कृष्णा के. शर्मा, गायत्री साहू, संदीप कुमार डे (एसके डे), जितेंद्र शर्मा, प्रमोद तेवतिया, राजकुमार तिवारी, नरेंद्र शर्मा, राजाराम सिंह, अब्दुल कादिर यांना पुरस्कार देण्यात आले. त्या वेळी सर्वांना कोरोना वॉरियर प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्न देखील देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: