युवा पिढी वरच समाजाची भिस्त व्यसनामुळे तरुण पिढी चे पुढील भवितव्य धोक्यात

प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी सिरस़ो
आजच्या युवक हा उद्याचा भाग्यविधाता कुटुंब पर्यायाने समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते ग्रामीण भागातील युवा पिढी आज कोणत्या उंबरठ्यावर उभी आहे हे घरातील कर्त्या माणसाला माहित नाही ज्या युवा पिढीवर अख्या कुटुंबाचे सार अवलंबून आहे तोच युवा वर्ग आज घडीला सामाजिक तथा कुटुंबाची राखरांगोळी करीत असल्याचे काही भागात दिसून येत आहे तरुण वर्ग विविध प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे मोठ्या गावात पदवीधर शिक्षणाची सोय आहे प्रत्येक माता-पित्याची आपल्या मुलाकडून फार अपेक्षा असतात सर्वसामान्यांना कुटुंबाच्या जरी अधिक अपेक्षा नसल्या तरी शिक्षित होऊन कुटुंबाच्या आधारवड होऊन वृद्धापकाळातील दिवस आनंदित जाण्यासाठी त्या मुलांमध्ये सु संस्काराची जोड मिळावी अशी अपेक्षा जन्मदात्या प्रत्येक माता-पित्याची असते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटल्या जाते कोणत्याही कामाचा भार नसल्याने बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसतात सु संस्काराची पायमल्ली करून काही तरुण वाम मार्गाला लागल्याचे दिसतात यावर निश्चितच आत्मचिंतन करण्याची वेळ आहे