रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष गजाननभाऊ कांबळे ह्यांचा वाढदिवस उपेक्षित बांधवाना ब्लँकेट देऊन साजरा

अविनाश एस. पोहरे – संपादक
पातूर शहरातील उपेक्षित बांधवाना आज गजाननभाऊ कांबळे रिपाई महानगर अध्यक्ष ह्यांच्या वाढदिवसानिमित्त कडाक्याच्या थंडी मुळे सर्वत्र थंडीचे वातावरण असून अनेक गोर गरीब बेसहारा बांधव उघड्यावर वास्तव्यास आहेत त्यांना कुणाचा सहारा नसून सामाजिक बांधिलकी जोपासून पातूर तालुक्याच्या वतीने आज 50 ब्लँकेट वाटप करण्यात आले.ह्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मंगल डोंगरे ह्यांनी आयोजन केले ह्यावेळी प्रामुख्याने पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,रिपाई ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा पोहरे,ईगल ग्रुप चे अध्यक्ष सागर इंगळे,संभाजी ग्रुप प्रतिष्टान अध्यक्ष कैलास बगाडे,प्रहार सेवक अमोल करवते, अकोला एक्सप्रेस न्यूज चे संपादक अविनाश पोहरे,सामाजिक कार्यकर्ते राहुल भगत,प्रमोद डोंगरे,सामाजिक कार्यकर्ते राधे धाडसे,सुरज उपर्वट, युवराज अवचार,संतोष सावत,सोनू किरतकार,विशाल इंगळे,कुणाल हिवराळे,अमन गवई,विशाल निलखन,अनिकेत उपर्वट आदींसह असंख्य जण मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आगळा वेगळा कार्यक्रम आज साजरा झाला.