ताज्या घडामोडी

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत झाकिया वर्दक यांची भेट

मुंबई, दि. ३ : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत झाकिया वर्दक यांची मलबार हिल येथील अफगाणिस्तानच्या दूतावासात सदिच्छा भेट घेतली.

सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे सहसंचालक संजय कोरबु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त आशिष पेडणेकर, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे सचिव अजिंक्य देसाई यावेळी उपस्थित होते.

श्री.पटोले म्हणाले की, भारत व अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध आहेत. पुढेही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे संबंध असेच वृद्धींगत होतील. मुंबई हे पयर्टनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. असे सांगून राज्यातील संस्कृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी विधामंडळाविषयी माहिती दिली. महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या विविध योजना चांगल्या आहेत त्या अफगाणिस्तानच्या विधानमंडळासाठी विधायक ठरतील, असे त्यांनी सांगितले. तर राज्यातील संस्कृती, शिक्षण, उद्योग या क्षेत्राशी निगडीत संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती दिली.

अफगाणिस्तानच्या राजदूत झाकिया वर्धक म्हणाल्या, अफगानिस्तानमध्ये बॉलीवूडचे आकर्षण आहे. भविष्यात वाणिज्य क्षेत्र व उद्योग क्षेत्रामध्ये एकत्रित काम करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: