स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी व प्रहार बहुद्देशीय संस्था आस्टूल च्या वतीने फळे वाटप करून राष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

अविनाश एस.पोहरे – संपादक
आज राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पातूर येथील सार्थक टी सेंटर येथे दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला असून ज्यांना जगण्याची उमिद असते त्याला अवयवाची गरज नसते मग तो कसला अपंग अशी जिद्द मनाशी बाळगून जन्मजात वैद्यन्यानिक दृष्ट्या दिव्यांग बांधवाना जगण्याची नवी प्रेरणा घेऊन आयुष्य अनमोल असून दिव्यांग बांधवापासून जगण्याची दिशा आपल्याला शिकावी अशी प्रेरणा देणाऱ्या पातूर तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रविण गवई ,अनिकेत तांदळे ,शुभम चिंचोळकर ,संतोष इंगळे आदी बांधवासोबत आज स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी व प्रहार बहुद्देशीय संस्था आस्टूल ह्यांच्या सयुंक्त विद्यमाने आज दिव्यांग बांधवाना सर्व प्रकारचे फळ वाटप करून सामजिक बांधिलकी जोपासण्याचा कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून योग आला व सर्व दिव्यांग बांधवाना ह्यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या ह्यावेळी स्वाधीन बहुद्देशीय संस्थचे सचिव निलेश हिवराळे,प्रहार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अमोल करवते रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे,ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा सचिव नितीन घुगे,संदीप अळसकार,अर्जुन गहिलोत,सुनील बग्गन,रवी अवचार,राहुल वजाळे,उज्ज्वल अवचार,गणेश लाहुळकर,कबीर खंडारे आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.