ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. ८ : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाउंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टीचर प्राईज) जाहीर झाला आहे. याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात श्री. डिसले यांचा त्यांच्या कुटुंबियांसह सत्कार केला. यापुढील काळातही असेच उत्तुंग कार्य करुन राज्यातील इतर शिक्षकांना आपण प्रेरणा देत राहाल असे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री. डिसले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

१४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून श्री. डिसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हे निश्चितच गौरवास्पद व कौतुकास्पद आहे. ७ कोटी रुपयांच्या या पुरस्कारामधून ५० टक्के रक्कम ही अंतिम फेरीमधील ९ शिक्षकांना देण्याचे श्री. डिसले यांनी जाहीर केले आहे. हे निश्चितच अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी काढले.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांच्या विकासामध्ये श्री. डिसले यांचे  मार्गदर्शन घेतले जाईल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: