तेल्हारा येथे युवाशक्ती संघटनेचे आक्रोश मोर्चा व रस्ता रोको आंदोलन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
युवाशक्ती संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चा व रास्ता रोकोचे आयोजन केले होते सदर मोर्चाची दखल घेत शासनाने आपले प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी अकोला यांना तेल्हारा येथे पाठवून युवाशक्ती संघटनेच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने समाधान होण्याच्या दृष्टीने युवाशक्ती संघटनेला लेखी स्वरुपात आश्वासन देऊन जिल्ह्यातील सर्व व वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत तसेच युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले असल्याचे लेखी दिले.युवाशक्ती संघटनेच्या वतीने तालुक्यातील जीवघेणे रस्ते जलदगतीने दुरुस्त करण्यात यावे वान धरणाचे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता आरक्षित करण्यात यावे खरीप हंगामाची योग्य ती जानेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी आज दिनांक 4 डिसेंबर रोजी युवाशक्ती संघटनेच्या वतीने टावर चौक तेल्हारा ते शेगाव नाका तेल्हारा पर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा हा उपविभागीय अधिकारी तथा समकक्ष अधिकारी येईपर्यंत मागे घेणार नाही ही प्रमुख मागणी युवाशक्ती संघटनेकडून करण्यात आली होती सदर मागणीच्या अनुषंगाने सदर मोर्चाची जिल्हा प्रशासनाने दखल घेत सुरंजे साहेब उपजिल्हाधिकारी अकोला यांना सदर मोर्चाला भेट देण्यास व तक्रार निवारण करण्यास पाठविले होते अनुषंगाने उपजिल्हाधिकारी यांनी सर्व समस्या ऐकून घेत सर्व समस्या ह्या गंभीर स्वरूपाच्या असून जिल्हा पातळीवरील असल्यामुळे सदर मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळासह चर्चा करण्यासाठी व तालुक्यातील समस्यांचे निवारण करण्यासाठी 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दुपारी तीन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे लेखी पत्र युवाशक्ती संघटनेला दिले आहे असे लेखी दिल्यानंतर सदर आंदोलन युवाशक्ती संघटनेच्या वतीने मागे घेण्यात आले आंदोलनाला तालुक्यातील जनतेने व व्यापारी संघटनांनी प्रतिसाद दिल्याने त्यांचे आभार युवाशक्ती संघटनेच्या वतीने मानण्यात आले सदर मोर्चासाठी पोलीस निरीक्षक दिनेश शेळके व पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होताउपजिल्हाधिकारी यांचे तालुक्यातील आनेवाली बाबत स्थानिक प्रशासनाला निर्देश तालुक्यातील नजर अंदाज आनेवारी ६२ पैसे काढण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी हा दुष्काळ मदत निधी तसेच पीक विम्यापासून वंचित राहिला आहे सदर ६२ पैसे आनेवारी काढली तरी कशी असे युवाशक्ती संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्थानिक प्रशासनात योग्य आनेवारी काढण्याचे निर्देश दिले आहेत.