शहीद कैलास निमकंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार ठाकुर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

मौजे शिर्ला येथील गट क्रमांक 73 मधील पाच एकर जमीन शहिदांच्या कुटुंबीयांना मिळावी
अविनाश पोहरे – संपादक
20/ 5/ 2005 साली देश सेवा करीत असताना शहीद झालेल्या कैलास निमकंडे यांचे पार्थिव जेव्हा पातुर येथील शिलाऀ गावी आले होते तेव्हा अनेक राजकीय नेत्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी पाच एकर जमीन कैलास निमकंडे यांच्या आई-वडिलांना देण्याचे आश्वासने दिली होती.परंतु 2020 वर्ष संपत येत आहे तरीसुद्धा अजून पर्यंत कुठल्याच प्रकारे जमीन मिळाली नाही एक फौजी देशासाठी देश सेवा करीत असताना आपले सर्वस्व पणाला लावून देश सेवा करत असतो परंतु या देशातील राजकीय नेते व अधिकारी यांनी कुठल्याच प्रकारे दखल न घेता गेली एवढ्या वर्षात सुद्धा शहीद यांच्या आई-वडिलांना न्याय मिळवून दिला नाही या गोष्टीचे संग्यान घेऊन सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना 9/ ऑक्टोंबर 2020 रोजी मागणीकरिता निवेदन दिले होते तरीसुद्धा ह्याच्यावर कुठल्याच प्रकारे पूर्तता झाली नसल्याने शिवकुमार सिंग ठाकूर यांनी आज जिल्हाधिकार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचे ठरविले व आज पासून ते उपोषणाला बसले यावेळी ज्येष्ठ सामाज सेवक अण्णा हजारे,तसेच सिने अभिनेता नाना पाटेकर यांनी शिवकुमार सिंह ठाकूर यांना दूरध्वनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत असे संपर्क करून बोलले.