ताज्या घडामोडी
हरिष गवळी पातूरचे नवे ठाणेदार

पातूर – पातूर पो. स्टे. नवे ठाणेदार म्हणून हरिष गवळी यांची नियुक्ती झालेली आहे. ते दि. ७ नोव्हेंबर रोजी कार्यभार सांभाळतील.सध्या पातूर येथे गजानन बायस ठाकूर हे कार्यभार पाहत आहेत. त्यांची बदली रामदास पेठ पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. ठाकूर यांनी ६ जून रोजी पातूर पो. स्टे. चा कार्यभार सांभाळला होता. त्यांनी पातूर शहरात अनेक चांगले उपक्रम राबवून नागरिकांची जागृती केली. त्यांनी कोरोना काळात लोकांना शिस्त लागावी म्हणून स्वत: रस्त्यावर येऊन विनामास्क फिरणार्या नागरिकांना समज दिली.
ठाणेदार हरिष गवळी हे सध्या बोरगांव मंजू येथे रुजू होते. त्याठिकाणी त्यांची कारकीर्द चांगली राहीली आहे. त्यांच्या कामाबद्दल नागरिक समाधानी आहेत. आता पातूर शहराचा कार्यभार ते कशाप्रकारे सांभाळतात हे लवकरच समजेल.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.