आलेगाव येथे दोन मनोरुग्णांनी बसस्थानका समोर जाळले दुकानांसमोरील साहित्य, हजारोंचे नुकसान

कृष्णा मोहाडे /आलेगाव प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगाव येथे मंगळवार दि.०३ नोव्हेंबर २० रोजी मध्यरात्री पासून रात्रभर बसस्थानकावरील दुकानांसमोरील साहित्य प्रवासी निवाऱ्यासमोर गोळा करून रात्रभर जाळले यामध्ये शालिग्राम तेलगोटे यांच्या दुकानांसमोरील बरदाना , गोपाल धाईत यांच्या हातगाड्या , गोपाळ कोरकने यांच्या दुकांसमोरील बाखडे तसेच मो.फारूक व
सै.अबरार यांच्या दुकानांसमोरील साहित्य जाळले आहे बुधवार दि.९४नोव्हे.२०रोजी सकाळी काही शेतकरी शेतात जात असताना त्यांना बसस्थानकावर धूर दिसल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता हे दोन मनोरुग्ण हे कृत्य करीत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी गावातील नागरिकांना कळवले असता गावातील नागरिकांनी एकत्र येऊन शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे हे कृत्य करणारे मनोरुग्ण असल्याने पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे