ताज्या घडामोडी

अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता

हाता बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2020-21 अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नवीन सिंचन विहीर 2 लक्ष 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती रु 50 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु. 1 लक्ष, ठिबक संच रु. 50 हजार, तुषार संच रु. 25 हजार, पंप संच रु. 20 हजार, वीज जोडणी आकार रु. 10 हजार इत्यादी घटकांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज www.mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरावे, असे अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे,उपसभापती सौ.रिता योगेश, शेळके, गटविकास अधिकारी, मदनसिंग बहुरे व सहा.गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसोबत शेतकऱ्याचे नावे मूळ सातबारा उतारा, शेतकऱ्याचे नावे मूळ आठ-अ उतारा, बँक पासबुक सत्यप्रत, आधारकार्ड सत्यप्रत जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचा रुपये 1 लक्ष 50 हजार पर्यंतचा सन 2019-20 चा उत्पन्न दाखला, ग्रामसभा ठराव आठ-अ व सातबारा उताऱ्यावर एक पेक्षा जास्त नावे असल्यास रु.100/- च्या मुद्रांक पेपरवर संमती पत्र, अपत्याचे स्वयंघोषणापत्र, शौचालय असल्याचे आणि वापर करीत असल्याचे स्वयंघोषणापत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून कृषि अधिकारी (वि.घ.यो) पंचायत समिती अकोला यांचे कडे सादर करावे
योजनेकरिता प्रमुख निकष व अटी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेकरिता लाभार्थी हा अनुसूचित जमाती मधील असावा, शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक राहील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकरिता लाभार्थी अनुसूचित जाती मधील असावा, शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक राहील, नवीन विहीरीच्या लाभाकरिता शेतकऱ्याकडे किमान 0.40 हे. ते कमाल क्षेत्र मर्यादा सहा हेक्टर राहील, शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष 50 हजाराच्या आत आहे अश्या शेतकऱ्यांनी सबंधित तहसिलदार यांचे कडून सन 2019-20 चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला अर्जासोबत दाखल करावा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्राने कडून प्राप्त सुरक्षित झोन असलेल्या गावामधील शेतकऱ्यांनीच फक्त नवीन सिंचन विहिरी करिता अर्ज करावे. अधिक माहितीकरीता कृषि अधिकारी(वि.घ.यो)पंचायत समिती अकोला यांचेशी संपर्क साधावा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: