ताज्या घडामोडी
बोरगाव मंजू येथील शेकडो कार्यकर्त्यांचा ‘प्रहार’ मध्ये प्रवेश

अविनाश पोहरे – संपादक
बोरगाव मंजू- स्थानिक बोरगाव मंजू येथील शेकडो नागरिकांनी बच्चुभाऊ कडू यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील, माजी महानगराध्यक्ष बिट्टू वाकोडे, माजी पातुर तालुकाप्रमुख शुभम थिटे,सुज्ञेश साखरे, श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरविंद पाटील यांनी सर्व प्रहार सेवकांना आपले अमूल्य मार्गदर्शन केले व सर्वांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.