आलेगाव येथे जुगार अड्डयावर चान्नी पोलिसांची धाड सहा आरोपी अटक.

कृष्णा मोहाडे
आलेगाव /ग्रामीण प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनला नव्याने रूजू झालेले ठाणेदार राहुल वाघ यांना आलेगाव येथे जुगार चालू असल्याचे कळताच ठाणेदार राहुल वाघ व त्यांचे सहकारी उ.नि.पद्माकर पातोंड बालाजी सानप, बुधवंत रावसाहेब , बाळू इंगळे , दादाराव आढाव, योगेश डाबेराव यांनी सापळा रचून आलेगाव येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता आरिपी महादेव भगवान घायवट ,गजानन बबन सोनोनो , प्रवीण तुकाराम लहामागे , मो. शफी मो.गणी सर्व राहणार आलेगाव, सूर्यभान हरिभाऊ लठाड रा.जांब , धनराज सखाराम देवकर रा. चारमोळी या सहा आरिपींना जुगाराचे साहित्य , चार मोबाईल फोन व रोख रक्कम असा बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक केला आहे व महेंद्र मूर्तडकर हे फरार होण्यात यशस्वी झाले आहे या सातही आरोपीं विरद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,पोलीस स्टेशन चान्नी येथे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार राहुल वाघ यांनी शनिवार दि.३१/१०/२०२० ला चार्ज स्वीकारला व दबंग कामगिरीला सुरवात करत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याची सुरवात केली आहे , सर्वत्र ठाणेदार राहुल वाघ यांचे कौतुक होत आहे