ऐरोलीत रक्तदान शिबिर संपन्न

- माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांची उपस्थिती
अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी
ऐरोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे युवा नेते संजय परशुराम भोसले यांच्यावतीने आणि साई कॉलनी मित्र मंडळ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वीट भट्टी साई कॉलनी परिसरातील मैदानात कोरोनाचे नियम पाळत पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाप्रसंगी मारुती कांबळे, सुभाष रसाळ, प्रताप जाधव, अनिल शिंदे, प्रभाग क्रमांक 11 चे शाखाप्रमुख किरण पाटील, संतोष नाईक, मनोज यादव, धनाजी जाधव, सागर हळकुंडे, अशोक सोनवणे, हनुमंत खेडेकर, सुहास पाटील, सुनील नडे आदी मान्यवर त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवसैनिक नागरिक शिस्तबद्धपणे या उपक्रमात सहभागी झाले होते.
माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी रक्तदात्यांशी संवाद साधला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना विजय चौगुले, संजय भोसले आणि सहकाऱ्यांनी प्रशस्तीपत्र व मास्क, सैनी टायझर, गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले. या शिबिरात महिला व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला.
सध्या कोरोना महामारीच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे कोरोनाचे रुग्ण, अपघातातील जखमी त्याचप्रमाणे इतर गरजूंना वेळेत रक्त मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावे या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे युवा नेते संजय भोसले यांनी सांगितले.