ताज्या घडामोडी

सरदार वल्लभ भाई पटेल यांची 145 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी.

नयन खरात
तालुका प्रतिनिधी मेहकर

31 ऑक्टों 2020 रोजी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा व शिवशक्ती बहुद्देशीय संस्था यांच्या द्वारा लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती व राष्ट्रीय एकता दिवस मेहकर येथे संपन्न या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून किशोर गारोळे शिवशक्ती बहुद्देशीय संस्था मेहकर चे अध्यक्ष, व प्रमुख पाहुणे म्हणून गजानन पायघन अध्यक्ष मेहकर तालुका ग्रंथालय संघटना व दशरथ चनखोरे अध्यक्ष शोभा सार्वजनिक वाचनालय बोरी, नयन खरात तालुका समन्वयक नेहरु युवा केंद्र, हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोह पुरूष यांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर किशोर गारोळे नयन खरात यांनी त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला आपल्या भाषणांमधून त्यांनी सांगितले की देशाला एक वटण्यासाठी महान असे कार्य सरदार वल्लभाई पटेल यांनी आपल्या जीवनामध्ये केले आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात पोलादी पुरुष म्हणून अत्यंत आदराने त्यांना गौरविले गेले आहे चाणक्याची मुस्तदी नीती त्यांच्याजवळ होती अशाप्रकारे त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. यावेळी जनार्दन काळे ,दीपक गिरी ,आशिष गारोळे ,ऋषिकेश काकडे, कैलास नवले ,स्वप्निल गारोळे ,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गारोळे यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: