कोजागिरी पौर्णिमेला होतो भुलाबाईचा उत्सव साजरा

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा
हिवरखेड आसरा माता मदीर पेठपुरा येथील भुलजा भुलजी उत्सव सांगता
भुलाबाई हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो. महाराष्ट्रात इतर ठिकाणी प्रसिद्ध असलेला भोंडला विदर्भात मात्र भुलाबाईच्या नावाने साजरा केला जातो.
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती. हा महोत्सव घरोघरी लहान मुली स्थापना करुन साजरा करताना घरोघरी भुलाबाईची सजावट केली जाते त्याना हार फुले आनुन दररोज सध्याकाळी सजवीतात महिनाभर वेगवेगळा प्रसाद आनी तो कशाचा है भुलाबाइचे गित म्हननार्या मुली ओळखण्यासाठी जनु स्पर्धा करतात , आणि घरोघरी जाऊन मुली भुलाबाईची गाणी म्हणत त्या नंतर खिरापत (खाऊ) ओळखल्यानतंर सर्वांना खिरापत प्रसाद म्हनुन दिली जाते असे.भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपर्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. आडकित जाऊ की खिडकित जाऊ
खीडकीत होता बत्ता ! भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता
त्यानंतर एक निबुं झेलू बाई दोन निबु झेलू
दोनाचा पानोडा माहेर गेले हनवंता
हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो. पौर्णीमेला कोजागीरी ऊत्सव होतो तसा आता या ऊत्सवाला पाच गावरान धांडे खोपडी म्हनुन माडवून मंडपा प्रमाने आरास करतात आता तर अशी परीस्तिथी आहे की हायब्रीड ज्वार ची खोपडीही मिळणे मुश्किल मिळालीच तर तिच पंचधाडे खोपडी सगळी सारा मोहल्लाभर फिरताना दिसते
असा सनातन काळापासुन चालत आलेला भुलाबाई भुलाबाई प्रसाद घ्या अन पुढच्या खेपिला लवकर याम्हनुन दुसरे दिवशी भुलाबाई यांचे वीसर्जन केले जाते