स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोला जिल्हा आढावा बैठक संपन्न

अकोला तालूका प्रतिनिधि रोशन इंगळे
अकोला: रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बैठक घेण्यात आली या बैठकीत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली व त्यानंतर पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करत केंद्राने त्वरित कापुस खरेदी चालू करावी, शेतकऱ्यांना हमीभाव नुसतं कागदावर नाही तर बाजारपेठेतही हमीभाव मिळाला पाहिजे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असून परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे तरी सर्व विमा कंपन्यांनी सरसगट विमा शेतकऱ्यांना देण्याच्या. व शासनाकडून हेक्टरी 25,000 अशी मदत केंद्र शासनाने जाहीर करा या सर्व मागण्या 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत मान्य नाही झाल्यास त्यानंतर विदर्भात केंद्राचे जेवढे ही मंत्री असतील त्या मंत्र्यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल व चुकीचे अहवाल देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे फाडून जवा विचारला जाईल अशी घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे. पत्रकार परिषद जिल्हा रविकांत तुपकर सोबतच विदर्भ अध्यक्ष मुन्ना इंगोले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ कुमकर स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गवळी, कार्याध्यक्ष संजय सोनवणे , उपजिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे तालुका अध्यक्ष अकोला मंगेश गावंडे, तालुकाध्यक्ष अकोट संजय खोटरे, तेल्हारा तालुका अध्यक्ष श्याम भाऊ बोर्डे, तालुका उपाध्यक्ष बाळापुर पंकजा दुतांडे,राजू भाऊ गावंडे, अकोट व तेल्हारा बाळापूर तालुक्यातील कार्यक्रम उपस्थित होते