डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय येथे कोरोनाचे नियम पाळत परीक्षांना सुरुवात

सोशल डिस्टन्सिंग चे पालन करुन विद्यार्थ्यांची ऑनलाईन – ऑफलाईन परिक्षा
अविनाश पोहरे – संपादक
पातूर :- शासनाने व विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाचे नियम पाळत दि. २९ ऑक्टोबर २०२० पासुन डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय येथे परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्क लावुन महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. अमरावती विद्यापीठाने परिक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविल्यामुळे विद्यापीठाच्या निर्देशानुसार डॉ. एच. एन सिन्हा महाविद्यालयांने अंतिम वर्षांच्या परीक्षेची तयारी करुन सोशल डिस्टन्सिंग चे पालन करुन विद्यार्थ्यांची ऑनलाईन – ऑफलाईन परिक्षा घेण्यात येत आहे.सर्व प्रकिया ही विद्यापीठाच्या दिलेल्या नियमानुसार व निर्देशानुसार घेण्यात येत आहे.अश्या पद्धतीने महाविद्यालयाची सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पाडली जात आहे.