पत्रकारांना पोलीस सरंक्षण व आर्थिक पॅकेज जाहीर करा : अंकित क-हे

शेषराव बेलुरकार
ग्रामीण प्रतिनिधी कवठा
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका सहसचिव अंकित क-हे यांनी शासनाच्या समोर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहे ते पुढील प्रमाणे प्रकाशित करण्यात आले आहे (१) पत्रकार लोकांना पोलीस सरंक्षण द्यावे (२) पत्रकार लोकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे (३) पत्रकार लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना किड द्यावी (४) पत्रकार लोकांना अनुदान द्यावे (५) पत्रकार लोकांना धमक्या देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी (६) पत्रकार लोकांना धमक्या देणाऱ्या लोकांवर ३ वर्षाची कठोर कारवाई करण्यात यावी(७) पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारे विविध प्रकारच्या मागण्या शासनाच्या समोर ठेवण्यात आल्या आहेत .ग्रामीण भागात अवैध धंदे जोरदार सुरू असतात त्यामुळे पत्रकार आपल्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी आपले कर्तव्य पार पडत असतात परंतु अवैध धंदे करणारे लोक त्यांना जिवे मारण्याच्या किंवा पैसे घेऊन गप्प राहण्यासाठी सांगतात परंतु काही पत्रकार काळाबाजार करीत नाहीत म्हणून त्यांना लोक मारहाण करून जखमी करून घरातील सदस्यांना अशा प्रकारे मारहाण करण्यात येणार अशा धमक्या देतात त्यामुळे पत्रकार लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे .महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका सहसचिव अंकित क-हे यांनी बाळापूर तालुक्यातील पत्रकार लोकांना ठामपणे सांगितले की आपले काम आपण चालू ठेवावे काही अडचण निर्माण झाल्यास तातडीने संबंधित पोलीस स्टेशन गाठून पत्रकार सरंक्षण कायदा अंतर्गत कारवाई करावी असे आवाहन केले आहे .पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मी अंकित क-हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका सहसचिव सर्व पत्रकार लोकांना कळविण्यात येत आहे की आपल्या परिसरातील पत्रकार लोकांना धमक्या किंवा मारहाण झाल्यास आरोपी विरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार व आरोपींना ३ वर्ष कारावास व ५० हजार रुपये दंड देण्यात येणार आहे.ग्रामीण भागात पत्रकार लोकांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता आपले काम सुरळीत चालू ठेवावे काही अडचण निर्माण झाल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) यांच्याशी संपर्क करावा व जवळील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका सहसचिव अंकित क-हे यांनी व्यक्त केली आहे