वनी रंभापुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर

अविनाश पोहरे – पातूर
दि.२८ ऑक्टोबर २०२० रोजी अकोला जिल्ह्यातील वनी रंभापुर या गावांमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम १८ ते २१ वयोगटातील युवक युवतींनी आर.पार. ग्रुप चे गावपातळीवर संघटन करून हा पुतळा तयार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात निश्चय करण्यात आला आणि पुतळा तयार करून दि.२८ ऑक्टोबर २०२० रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भन्ते राज्योति यांच्या हस्ते बुद्ध वंदना घेऊन सुरू करण्यात आली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण रिपाइं (आठवले) महानगर जिल्हाध्यक्ष गजाननभाऊ कांबळे ,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे,रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोपणारायन,महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट,व स्वाभिमानी युवा पार्टीचे चे अकोला जिल्हाध्यक्ष सागरभाऊ खंडारे ,महासचिव सचिन जवंजाळ,पोलीस कर्मचारी गवई व केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या सर्व मान्यवरांचे भाषण झाले व ज्या कलाकाराने हा पूर्णाकृती पुतळा बनविला ते मनोहर इंगळे कलाकार यांचे सर्वांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे आयोजन आर.पार.ग्रुप चे सर्व सभासद १८ ते २१ वयोगटातील युवक युवती यांचे कौतुक व पुढील आयुष्याच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले एवढ्या कमी वयोगटातील युवक युवतींनी कोणाला ही दान न मागता व पूर्ण जबाबदारीने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. प्रकास आठवले, प्रास्ताविक साहेबराव सरकटे व आभार समाधान वानखड़े यांनी केले. कार्यक्रमासाठी आर.पार. ग्रुप चे अनिकेत वानखड़े, रितिक इंगळे,अनिकेत खंडारे,प्रवीण पांडे,रोषन इंगळे,रोशन वानखडे,रोहन आठवले, रेहान सय्यद,सुगत वानखडे,पायल वानखडे,वैशाली वानखडे,मेघा डोंगरे,शुभांगी वानखडे आशु वानखडे,शिल्पा मनोहर,सपना मनोहर,अनिता बगळे,हर्षा वानखडे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.