आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर डॉ अशोक गावीत्रे याची निवड

शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
साईनाथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी.तसेच युवा मराठी चित्रपट संस्थाचे संस्थापक ,अशोका ग्रामीण बहुउद्याशीय संस्थेचेे अध्यक्ष ,ग्राहक प्रबोधन समिती चे राज्य उपविभाग संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य अश्वमेध मेडीकल ट्रस्ट , तसेच मोहन फौंडेशन व मद्रास चे लाईफ मेंबर डॉ.अशोक गावीत्रे याची नुकतीच आखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीवर निवड करण्यात आली,हा सोहळा पुणे येथील महामंडळ मुख्य कार्यालयात पार पडला यावेळी संस्थाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते डाॅ.गावित्रे यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी बोलतांना डाॅ.गावित्रे म्हणाले की आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवुन माला जी संधी दिली आहे. यासंधीला नक्कीच न्याय देऊन कलाकारांच्या अधिकाधिक आरोग्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहील.बरीच वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत आसल्यामुळे आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आरोग्य समितीला नक्कीच याचा फायदा होईल. या पुरस्कार सोहळा प्रसंगी अण्णा गुंजाळ,भरारी पथक सदस्य नागनाथ गवसाने ,दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील,नंदन खरे,अमित अग्रवाल,अभिनेत्री ममता तायडे,तेजस्विनी भंडारे, सुर्या ग्रुप महाराष्ट्र निरीक्षक योगेश भागवतकर,न्यूज रिपोर्टर प्रीतम शहा उपस्तीत होते,या सर्वांनी त्याचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या