ताज्या घडामोडी

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे अनिल बोंडे

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी / नया अंदूरा

यावर्षी मुंग, उदीड, सोयाबीन, ज्वारी व आता कपाशीचे पीक हातातून निघून गेले आहे असे असताना आयुक्तानी शासनाकडे फक्त अकोला जिल्हयात ५५ हजार हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यासाठी भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी निंबा फाटा येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात केले पुढे बोलताना ते म्हणाले की
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायदेशीर असणारा कायदा केला असून या कायद्याला विरोध करणे म्हणजे शेतकरी स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम असून केंद्र सरकारच्या कायद्यातील बदलामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले असल्यामुळे शेतकरी सुखी व संपन्न होणार असून केंद्र सरकारने शेतकरी, शेतमजूर, महिला तसेच निराधार लोकांना कोरोना च्या भीषण संकटात मदत आर्थिक मदत केलेली आहे राज्य सरकारने या भीषण परिस्थितीत कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आता राज्यातील शेतकरी भयंकर नैसर्गिक संकटात सापडला आहे त्याच बरोबर अकोला जिल्ह्यात यावर्षी मुंग,उदीड, सोयाबीन, ज्वारी व कपाशीचे पीक कीड व रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निघून जाण्यासोबत परतीच्या पावसामुळे रब्बी हरभरा पिकाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झाले असताना मात्र महसूल विभागाने अकोला जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर जमिनीवरील खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कडे पाठविला असून तोच अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनाकडे सादर केला असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी करून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम थांबवून शेतकऱ्यांना गतवर्षी आजचे मुख्यमंत्री असणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेली हेक्टरी पंचवीस हजार रूपये मदत कुठलेही पंचनामे न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना द्यावी,हे सरकार फक्त अधिकारी वर्गाच्या बदल्या करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम करत नाही
आ रणधीर सावरकर
शेतकरी, शेतमजूर भंयकर आर्थिक संकटात आहे अतिवृष्टी मुळे अनेकांच्या घराची पडझड झाली काही शेतकऱ्यांच्या गुरेढोरे वीज पडल्याने दगावलेली आहे त्या संकटग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांना शासनाकडून मिळणारी तातडीची मदत मिळाली नाही कोरोना च्या काळात शेतकऱ्यांना व शेतमजुरांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा होती परंतु हे सरकार लोकांना वर्क फार्म होम चा सल्ला देत आहे शेतीचे कामे करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब उन्ह,पाऊस, थंडी असली तरी रात्री दिवसा शेतातच जावे लागते घरी बसून शेती करता येत नाही पण हया सरकारला शेतकऱ्यांच्या समस्याशी काहीही देणे-घेणे नाही उलट हे सरकार फक्त अधिकारी वर्गाच्या बदल्या करण्यातच गुंतले असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर यांनी केला,या कार्यक्रमाच्या सुरूवातीला काँग्रेसने शेतकऱ्याचे शेती साठी महत्त्वाचे असणारे वाहन जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला होता शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी ट्रॅक्टर पुजन करण्यात आले
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल,ललित समदुरकर,रामदास लांडे,विलास पोटे,अमोल साबळे,श्रीकृष्ण मोरखडे, मनिराम टाले,अशोकराव गावंडे, शामराव शेलार,राजेश रावणकार,राजेश नागमते,महेंद्र पेजवार,रतन गिरि,संजय अघडते,दिलीप पटोकार, अभिमन्यू नळकांडे,माधव मानकर, अमानकर,मनचितराव पोहरे, शंकरराव वाकोडे, राजेश्वर वैराळे, किशोर कुचके,रामराव कुचके, दिलीप सागळे,सुभाष अग्रवाल, शाम पोहरे, चंद्रकांत माळी,कनक कोटक,नंदु तायडे,देवेंद्र घेंगे,सकावत जागिरदार,गजानन थोरात, प्रशांत पोहरे, दिलीप ठाकरे,जयंता मसने,अनंता मनतकार,मनिष वैराळे, पुरूषोत्तम शेळके, शंकर सगणे, आदीसह बहुसंख्य शेतकरी हजर होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: