नफा तर दूरच शेतकऱ्यांना घरून पैशे भरण्याची आली वेळ कशी नशीबाने थट्टा आज मांडली..

शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
पिंप्री खुर्द.सोयाबीन, मुग, ज्वारी उडीदासह सर्वच पिकाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यावर्षी शेतकऱ्यांना पहिला शॉक म मुग उडीदाने दिला मुग उडीदावर्ती नैसर्गिक आपत्ती ओढवली अन शेतकऱ्यांचे पिक गेले म्हणून जड अंतकरनाने आपल्या शेतातील पिकावर रोट्यावेटर फिरवावे लागले आशा होती सोयाबीन पिकाची पण दुर्दैव आड आलेल्या आले शेतकऱ्यांच्या ऐन तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाला विविध रोगांचे व वातावरण बदल व परतीच्या पावसाचे ग्रहण लागले त्यात अख्खे सोयाबीन जमिनीच्या पदरात गिळून गेले शेवटी राहिलेले कापूस पीक तरी तारेल पण त्याही पिकाने शेतकऱ्यांची साथ सोडली शेतातील कपाशीच्या झाडावर आज शंभर टक्के बोड अळी आल्याने शेतकरी पूर्णतः खल्लास झाला आहे कापूस सोयाबीन मुग उडीद ज्वारी तूर या पिकाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच वर्ष भर चालतो पण पिक हाताचे गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या ने या वर्षी तर पिकाच्या लागवडीसाठी लावलेला खर्च देखील शेतकरी काढू शकला नाहीं नफा तर दूरच शेतकऱ्यावर जवळचा पैसा टाकण्याची नामुष्की ओढवली आहे शेतातील पिके नष्ट झाली आहे शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे शेतकऱ्यांना तातडीने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी काढलेला पिक विमा तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे या कडे आमदार प्रकशभाऊ भारसाकडे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे