गाडेगांव येथे नवदुर्गा विसर्जन साध्या पद्धतीने करण्यात आले

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथील भारत भुषण मंडळ . शिवाजी मंडळ . भारत माता मंडळ पैकी भारत भुषण मंडळ श्री नवदुर्गा विसर्जन आज दि. २६ रोजी करण्यात आले, गाडेगांव येथील ट्रॅक्टर द्वारा श्री नवदुर्गा विसर्जन करण्यासाठी वागेंश्वर पुर्णा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. गावातीलतील ३ सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे श्री नवदुर्गा मूर्तीची मनोभावे स्थापना करण्यात आली होती. यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे सोशल डिस्टन्ससिग चे पालन करीत श्रद्धेने नवदुर्गा उत्सव पार पडला. रोज कमी भक्त संख्येने कुठलाही गाजावाजा न करता सर्व नियम पाळून भक्तिभावाने आरती करण्यात आली, अष्टमीला होम झाले .
आज सकाळी ८.०० वाजता श्री नवदुर्गा विसर्जन कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता जागेवर आरती पुजा पाठ करून यावेळी भारत भुषण नवदुर्गा उत्सव मंडळ, मंडळातर्फे श्री नवदुर्गा देवीचे विसर्जन करण्यात आले यावेळी भारत भुषण मंडळ चे अध्यक्ष सचिन जळमकार.गणेश घावट.योगेश सोनोने.मंगेश आखरे.दत्ता दबडघाव.विजय बार्डे .अक्षय बाजोड रवी नळकांडे.पवन हिंगणकार.संजय खारोडे.ज्ञानेश्वर हिंगणकार.विनोद सोनोने .गोकुळ हिंगणकार. किशोर सोनोने विशाल जळमकार.गोलु कोगदे.अक्षय काळे.केशव नळकांडे.गजानन साबळे .विठ्ठल विठ्ठल महाले .कृष्णा दबडघाव सुरज नागोलकार. दत्ता उजाड शरद जळमकार.व इतर मंडळाचे सर्व सदस्य मंडळींनी तसेच भक्तांनी देवीला कोरोनाचे संकट दूर व्हावे तसेच सगळी परस्थिती पूर्ववत व्हावी या साठी देवीकडे साकडे घातले.