ताज्या घडामोडी

महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीला स्टॉल द्यावा -भाजपाचे मयूर धुमाळ यांच्यासह महिलांची आयुक्तांकडे मागणी

अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना स्वयंसिद्धा महिलांना त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठराविक कालावधीसाठी जागा उपलब्ध करून त्यांना मदत करावी व त्यांना आधार द्यावा, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटात अगदी मोठ्या मोठ्या उद्योगपतींपासून ते सर्वसामान्य आर्थिकदृष्टया दुर्बल कुटूंबातील नागरिक सुद्धा होरपळले जात आहेत. तब्बल ७ महिन्यांची टाळेबंदीमुळे कित्येक नागरिकांच्य नोकऱ्या गेलेल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटूंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीत समाजातील कष्टकरी महिला, माता, भगिनी पुन्हा एकदा नव्याने कुटूंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी विविध वस्तू, कंदील, खाद्यपदार्थ हे घरात बनवून विकणे असा स्वयंरोजगार करत आहेत. परंतु या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादी विक्रीसाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. जर या महिलांना त्यांनी स्वयंरोजगार संकल्पनेतून बनवलेले साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठराविक कालावधीसाठी जागा उपलब्ध झाली तर या महिलांना मोलाची मदत होऊ शकेल. 
या विषया संदर्भात आयुक्तांनी भाजपा शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा करून लवकरच उपायुक्तांना योग्य ते आदेश देण्याचे आश्वासन दिले. सदर वेळी भारतीय जनता पार्टी कोपरखैरणे तालुका महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती हलीगौडा, महिला मोर्चा सरचिटणीस विजया जाधव, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सोपान बैलकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: