नया अंदुरा येथील ग्रामपंचायत ची खातेनिहाय चौकशीची ग्रामस्थची मागणी
भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
येथील ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणचा इशारा दिला आहे.
या बाबत सविस्तर असे की बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शशिकांत इंगळे हे सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात शासकीय कागदपत्रांची मागणी केल्यास ऊळवा उळवी ची उत्तरे देतात आणि प्रकारच्या शासकीय दस्तऐवज मागितल्यास अशासकीय माणसाकडे पाठवुन बोळवण करतात परिणामी ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून
सदर ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य कारवाईची मागणी ग्रामस्थ करित अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी मुख्यकारेकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, आयुक्त अमरावती, जि. प अध्यक्ष अकोला,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, गटविकास अधिकारी बाळापूर संबंधितांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच पालकमंत्री मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प अकोला याना तात्काळ कारवाई करून अनुपालनाचा अहवाल शादर करनाचे निर्देश दिले आहेत.
उपोषण करता महेंद्र वानखडे ,संतोष घावट यांसह नेतृत्वात ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे