शालेय फीसाठी तगादा लावणाऱ्या खाजगी विना अनुदानित शाळांवर कारवाई करण्याची डॉ मनीषा कायंदे यांची शिक्षणमंत्रांकडे मागणी

अनंतकुमार गवई
मुंबई, प्रतिनिधी
मार्च २०२० ते आजतागायत आपण सर्वजण कोव्हिड १९ या महामारीशी लढत असून यावर अजूनही कोणतीही लस आली नसल्यामुळे ही लढाई आपल्याला अजून काही महिने तरी लढावी लागणार आहे. लॉकडाउन काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले तर लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थीक संकट कोसळले आहे, आता केंद्र व महाराष्ट्र सरकारने हळूहळू अनलॉकची प्रकिया सुरु केली असून आर्थीक चक्र सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत परंतु अनलॉक झाल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थानी पालकांकडे फी साठी तगादा लावलाच्या अनेक तक्रारी शिवसेना आमदार डॉ.मनीषा कायंदे यांच्याकडे आल्या असून त्यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन या खाजगी विना अनुदानित शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे . याविषयी अधिक माहिती देताना डॉ.मनीषा कायंदे सांगतात, ” लॉकडाउन काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यात तसेच छोट्या उद्योगधंद्यांचे नुकसान झाले आहे , जून २०२० पासून राज्यातील खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली , यावेळी सुद्धा पालकांनी कसेबसे आपल्या पाल्याला स्मार्ट फोन तसेच कॉम्प्युटरची सुविधा उपलब्ध करून दिली,पंरतु आता या शाळा फीसाठी पालकांकडे तगादा लावीत असून विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत आहेत. अशा शैक्षणिक संस्थांवर त्वरित फौजदारी कारवाई करण्याची मागणी मी शिक्षणमंत्रांकडे करीत आहे. अनेक खाजगी शिक्षण संस्था स्पोर्टस डे, कॅलेंडर फी, बससेवा शुल्क, पिकनिक फी तसेच कॅन्टीन शुल्क, शारीरिक तंदुरुस्ती शुल्क अशा विविध क्लुप्त्या काढून वाढीव फी मागत आहेत, राईट टू ऐजुकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून बाहेर न काढणे, प्रत्येक खाजगी शाळेचे लेखापरीक्षण करण्यात यावे तसेच पालकांना देय असलेली फी हफ्ताने भरता यावी याकरिता आदेश द्यावे, अशी विनंती मी व मा. आ. विलास पोतनीस यांनी शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.”