बोगस बियाणे प्रकरणी बियाणे कंपनीसह कृषि केंद्राची पोलिसात तक्रार

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशीची लागवन केले, मात्र या कपाशीला कुठलेच पीक नआल्याने शेतकऱ्याने बियाणे कंपनी तशेच कृषी केंद्रा शी वारंवार संपर्क केला मात्र त्यांनी कुठलीच दाद न दिल्याने अखेर शेतकऱ्याने उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
प्राप्त माहितीनुसार अंदुरा येथील शेतकरी प्रवीण उर्फ बाबूराव राखोंडे यांनी आपल्या ३८३ गट क्रमांक असलेल्या चार एकर शेतात राशी कंपनीच्या वाणाचे ६५९ बिजी २ तशेच मेघना बिजी २ ची शेतात सात जून २०२० रोजी पेरली चार महिना नंतरही या कपाशीला कापूस व कुठलाच माल न लागल्याने तेल्हारा येथिल बियाणे विकत घेतलेल्या भुमिपुत्रा कृषी सेवा केंद्र च्या संचालकाशी संपर्क साधला त्या नंतर त्यांनी बियाणे कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या बाबत वारंवार अवगत केले, मात्र सदर शेतकऱ्याला प्रतिसाद या कृषी केंद संचालकांने वा बियाणे कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी न दिल्याने आपली फसवून झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्ष्यात आले, साधारण दोन लाखाचे नुकसान झाल्याने या हदबल शेतकऱ्यांने २४ ऑक्टोंबर रोजी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून आपल्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्याने सहकुंटब आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.