लोहारा येथे श्री महर्षी वाल्मिकी जयंती संपन्न

संतोष मोरे
ग्रामीण प्रतिनिधी लोहारा
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील बहिरमेश्वर संस्थान मंदिरामध्ये श्री महर्षी वाल्मिकी जयंती संपन्न करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या फोटोला हार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . श्री रामचंद्रांच्या जीवनावर आधारित सर्वात प्रथम रामायण ग्रंथ लिहिला आहे असे आमचे दैवत श्री महर्षी वाल्मिकी यांची जयंती लोहारा येथील तरुणांनी अगदी सध्या पध्दतीने हा क्रार्यक्रम संपन्न केला. कोरोना माहामारीने सर्पुण भारत भर हाहाकार घातले असुन महाराष्ट्र राज्यांत लाॅकडाऊन च्या काळामध्ये आता कोणतेही सन उत्साहाने साजरा केला जात नाही त्यामुळे अगदी सध्या पध्दतीने हा येथील नागरिकांनी क्रार्यक्रम संपन्न केला. प्रमुख उपस्थितीत म्हणून संजय वावरे, बाळकृष्ण इंगळे, दिपक कुऱ्हाडे, संदिप ढेले, दिलीप धामोडे, सुभाष वावरे ,राहुल वावरे, रितेश ठाकुर अजय वावरे, धिरज घावट, महेश वावरे, अजय वावरे,रोहन रायबोये, राजुभाऊ पांडे यांच्या उपस्थितीत हा क्रार्यक्रम संपन्न झाला.